Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

AAi sathi kavita

ओसंडुन उत्साह वाहतो, उत्सव षष्टपूर्तीचा  ! सह परिहार नमितो आम्ही, भाव मनी सत्काराचा  !! झुलते तोरण द्वारी  वेलीचे, पवित्रता भारुनी राही ! नमुनि मंगलमूर्ती पूजिला , सत्यनाथ र्हुदायाठायी  !! तोच जाणता  त्रेलोक्याचा, करता हरता तोच असे ! स्मरता त्यासी येई धाउनी, संकटात हि झेलितसे  !! कसे निर्मिले  चंचल मन हे, चिंतेने व्याकूळ  चित्ति  ! मोकाट सुटे अधिराईने, स्वारी करी वार्या वरती !! आयुष्याचा कण  कण  वेचुनि, रंगवू पाहे नभांगणा ! आली  पराकष्टेची सिमा, काय कसे सांगू कोणा ? गेला प्रातःकाळ  मध्यां:न्ह आता संध्याकाळ आयुष्याचा ! कर्तव्याची  झाली  सांगता, अन फुलला वृक्ष   चंदनाचा !! आशिर्वाद तव झाले पुलकीत, उडे बांगडे स्वच्छंदी ! चिमण  जणू का  इकडून तिकडे चिवचिवति फांदी फांदी !! सुख दुःखाची उनसाऊली, कधी चांदणे पौर्णिमेचे ! लहान मोठ्या जरी बुटयांचे, वस्त्र हे च आयुष्याचे !! दुःखा  नंतर सुख निर्मिले विधी लिखित आहे दोन्ही! सुखदुःखाचे विश्वचक्र हे, चुकून थांबवू नका कोणी !! !! आयुष्...